मुंबईतला पांढऱ्या पट्टीचा वाद नेमका काय? जैन विरुद्ध मराठी असा संघर्ष का झाला?
मुंबईतील घाटकोपरमधील कैलास अॅव्हेन्यू सोसायटीत जैन मुनींसाठी पांढऱ्या पट्ट्या आखल्याने वाद निर्माण झाला. प्रसाद वेदपाठक यांनी यावर आक्षेप घेतला आणि वाद व्हॉट्सअॅपवरून पोलीस ठाण्यात आणि मनसेपर्यंत पोहोचला. मनसेने या पट्ट्यांना विरोध दर्शवला आणि सांस्कृतिक दहशतवाद म्हणत निषेध केला. या वादामुळे सोसायटीत धार्मिक तेढ निर्माण झाली असून, स्थानिकांनीही विरोध केला आहे.