MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोण? सोशल मीडियावर जोरदार चर्चा
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील माजगावचा विवेकानंद पाटील, एमपीएससीच्या आंदोलनात त्याच्या ठसकेबाज भाषणांनी चर्चेत आला आहे. रोहित पवारांच्या नेतृत्त्वात पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनात त्याने आपल्या खास शैलीत भाषण करून लाखो तरुणांचे लक्ष वेधले आहे. विवेकानंदने राज्यशास्त्रात पदवी घेतली असून, एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत आहे. त्याच्या भाषणात कवितांचे दाखले आणि शेरोशायरीमुळे तो लोकप्रिय झाला आहे.