“नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सुप्रीम कोर्ट अजून विचार करतंय”, जयंत पाटलांची टोलेबाजी!
महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात राहुल नार्वेकर यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली. सत्ताधारी व विरोधी पक्षांनी त्यांचे अभिनंदन केले. अजित पवारांनी नार्वेकरांच्या तटस्थ निर्णयांचे कौतुक केले, तर जयंत पाटील यांनी मिश्किल टिप्पणी केली. पाटील यांनी नार्वेकरांच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करत असल्याचे नमूद केले. देवेंद्र फडणवीसांमध्ये झालेल्या बदलांवरही पाटील यांनी भाष्य केले.