सेकंदात झाडल्या ३३ गोळ्या, भरदिवसा घडलेलं जेजे हत्यांकाड; ‘त्या’ गोळीबाराची कहाणी!
१२ सप्टेंबर १९९२ रोजी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात अरुण गवळीचा साथीदार शैलेश हळदणकरवर गोळीबार झाला. काही सेकंदात ३३ गोळ्या झाडल्या गेल्या, ज्यात हळदणकर आणि दोन पोलीस ठार झाले. हा हल्ला दाऊद इब्राहिमच्या टोळीने दाऊचा मेव्हणा पारकर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी केला होता. ३२ वर्षांनंतर, २०२४ मध्ये त्रिभुवन सिंगला अटक झाली. या प्रकरणाचा तपास हा आता मुंबई पोलिसांसाठी नवे आव्हान आहे.