काळाचौकीचा महागणपती मंडपात भीषण दुर्घटना! शॉक लागून एका चिमुरडीचा मृत्यू
मुंबईतील गणेशोत्सवात काळाचौकी महागणपती मंडपात विजेचा झटका लागून एका ८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आणि पाच जण जखमी झाले. रविवारी पहाटे ही दुर्घटना घडली. गर्दीमुळे दर्शनासाठी उभ्या असलेल्या भाविकांना विजेचा झटका बसला. मृत मुलीच्या मावशीने मंडळाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले. लालबाग परिसरातही तुफान गर्दी होती. गणेशोत्सवात मुंबईत विविध दुर्घटना घडत आहेत.