सविस्तर: कोकणच्या दुबार मतपेढीचे लाड; एसटीचे हाल!
कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने ५७४१ बस सोडल्या आहेत. त्यातील अर्ध्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वखर्चाने आरक्षित केल्या आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच त्यातल्या २९०० बस ‘बुक’ केल्या आहेत. या बसमधून अर्थातच कोकणवासीयांसह फुकटे पर्यटकही भरपूर आहेत. कोकणात जाणाऱ्या भाविकांचे इतके लाड का, असा प्रश्न राज्यातील अन्य प्रदेशांतील नागरिकांना आता पडू लागला आहे.