“लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा होण्यास सुरुवात”, भाजपा आमदाराने दिली माहिती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी ही योजना १ जुलैपासून अंमलात आणली असून आतापर्यंत १ कोटी ३५ लाख अर्ज स्वीकारले आहेत. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर १७ ऑगस्ट रोजी निधी जमा होणार होता, परंतु आधीच जमा झाला आहे.