Ladki Bahin Yojana: राज्यातील ५३ हजार लाडक्या बहीणींची ओवाळणी हुकली
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीची पडताळणी तसेच ई-केवायसी प्रक्रियेनंतर लाखो महिलांची नावे यादीतून वगळण्यात आली. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याचे अनुदान ‘ओवाळणी’ म्हणून सरकारच्या वतीने तीन दिवसापासून वितरित केले जात आहे. यात अनेक कारणास्तव सुमारे ५३ हजार ६३७ लाडक्या बहीणींना सरकारची १५०० रुपये ‘ओवाळणी’ मिळालेली नाही.