Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण योजने’च्या अर्ज प्रक्रियेमुळे महिलांच्या बँक खात्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती उघड; आदिती तटकरेंनी दिले आदेश!
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे. परंतु, अनेक महिलांची बँक खाती आधारशी लिंक नसल्याचं आढळलं आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात विशेष मोहिम राबवण्याचे आदेश दिले आहेत. १७ ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त खात्यांना आधार लिंक करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ३१ ऑगस्टनंतरही अर्ज प्रक्रिया चालू राहणार आहे.