महा टीईटी परीक्षा पुढे ढकलली, पेपरफुटीचा संशय
नोकरी टिकवण्यासाठी शेवटची संधी होती, पण २४ तास आधीच खेळ बिघडला; 'महा टीईटी'च्या ६ लाख शिक्षकांचे आता काय होणार?
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (Maha TET) अवघे २४ तास शिल्लक असताना अचानक पुढे ढकलण्यात आली. भिवंडी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार झालेल्या कारवाईत प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आल्याने राज्य परीक्षा परिषदेने हा मोठा निर्णय घेतला. शेवटच्या क्षणी घेतलेल्या निर्णयामुळे सहा लाखांहून अधिक नोंदणीकृत उमेदवार, त्यात सेवेत असलेले हजारो शिक्षकही, अनिश्चिततेच्या गर्तेत सापडले आहेत.