काँग्रेसमध्ये चाललंय काय? नाना पटोलेंच्या राजीनाम्याची चर्चा, वडेट्टीवार म्हणतात, “कदाचित…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी पदमुक्त करण्याची विनंती राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाची चर्चा सुरू आहे. विजय वडेट्टीवार यांनीही या घडामोडींवर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाल्यामुळे पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे.