गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ‘ड्रेस कोड’, तोकड्या कपड्यांवर बंदी
रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथील श्रीदेव गणपती मंदिरात १ जानेवारी २०२७ पासून भाविकांसाठी ड्रेस कोड सक्तीचा केला जाणार आहे. मंदिराचे पावित्र्य आणि परंपरा जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गुडघ्यापेक्षा वर असणारे तोकडे कपडे, शॉर्ट्स किंवा स्कर्ट घालून येणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. हा नियम पुरुष आणि महिला दोघांनाही लागू असेल, मात्र १० वर्षांखालील मुलांना सूट देण्यात आली आहे.