“मुंबई पालिका आयुक्त गगराणी भाजपाच्या नेत्यांबरोबर एका खोलीत बसून…”, राऊतांचा गंभीर आरोप
राज्यात २९ महापालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. मतदानाची टक्केवारी जाहीर होण्याआधीच एक्झिट पोल्स आल्याने विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी भाजपाच्या नेत्यांनी पालिका आयुक्तांसोबत गुप्त बैठक घेतल्याचा आरोप केला. राऊतांनी विश्वास व्यक्त केला की, ठाकरे बंधूंचा महापौर होईल.