महाराष्ट्रात ९९० कोटींच्या २ रेल्वे प्रकल्पांना मंजुरी; ‘या’ जिल्ह्यांना होणार फायदा
भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातील रेल्वे जाळे मजबूत करण्यासाठी ९९० कोटी रुपयांच्या दोन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. चौक-कर्जत मार्गाचे दुहेरीकरण (४९७ कोटी रुपये) आणि मुकुटबन-गडचांदूर नवीन रेल्वे मार्ग (४९३ कोटी रुपये) यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे प्रवासी आणि मालवाहतूक वेगवान होईल, औद्योगिक क्षेत्राला फायदा होईल, आणि स्थानिक प्रवास अधिक सुकर होईल.