पदक जिंकले, तरी पैसे मिळणार नाहीत? खेळाडूंसाठी सरकारने बदलले रोख पारितोषिकाचे नियम
मुंबई : केवळ पदक जिंकणे आता पुरेसे नसून, महाराष्ट्र सरकारच्या रोख पारितोषिकासाठी खेळाडूचा अधिकृत अधिवास आणि राज्याचे प्रतिनिधित्वही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. राज्य सरकारच्या सुधारित नियमांनुसार, आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावर यश मिळवूनही महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल) नसल्यास खेळाडू पारितोषिकाला मुकणार आहेत.