Maharashtra SSC Result 2025: दहावीचा निकाल जाहीर, यंदाची टक्केवारी ९४.१० टक्के!
महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल २०२५ अपडेट्स: महाराष्ट्र शिक्षण मंडळाने आज दहावीचा निकाल जाहीर केला असून यंदाचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. राज्यभरातील ९ शिक्षण विभागांतून १५ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी जवळपास १४ लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दहावीचा निकाल शालेय शिक्षणातून पुढच्या शिक्षण प्रवासाची सुरुवात दर्शवतो.