प्राध्यापकाची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी कसं पकडलं?
मालाड रेल्वे स्थानकात एका प्राध्यापकाची हत्या झाल्याची घटना घडली. लोकलमधून उतरताना झालेल्या वादातून आरोपीने प्राध्यापक अलोक कुमार सिंग यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्यांना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी तपास करून आरोपीला आज सकाळी मालाड येथे अटक केली. आरोपी नियमित चर्नीरोडला जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समजले.