मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, तुर्तास मुंबईत येण्याच्या निर्णय स्थगित
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी २० दिवसांनंतर उपोषण सोडले. सरकारच्या शिष्टमंडळाने बीडमध्ये त्यांची भेट घेऊन मनधरणी केली. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि इतरांनी चर्चा केली. उपोषण सोडत असताना, जरांगे पाटील यांनी सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा वेळ दिला, अन्यथा मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला.