“मोहनराव, आपण कधी ठासून बोलणार?” राज ठाकरेंचा सरसंघचालक मोहन भागवतांना सवाल!
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर टीका केली आहे. भागवत यांनी भाषेच्या आग्रहाला आजार म्हटल्याबद्दल राज ठाकरेंनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी भागवतांना विविध राज्यांतील भाषिक अस्मिता समजून घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरेंनी भागवतांवर टीका केली आहे आणि अप्रत्यक्ष राजकीय भूमिकांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.