“१६ मे रोजी…”, प्रदेशाध्यक्ष पदाच्या चर्चेबाबत अमोल कोल्हेंनी स्पष्टच सांगितलं!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांमध्ये शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे संयुक्तिक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होणार होते, अशी माहिती रोहित पवारांनी दिली. अमोल कोल्हे यांनीही या चर्चांची पुष्टी केली. जयंत पाटलांच्या घरी १३ बैठका झाल्या होत्या. प्रफुल पटेल यांनी अजित पवारांच्या निधनानंतर अशा चर्चांना विरोध दर्शवला.