‘MPSC द्वारे मोठी भरती होणार’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी UPSCच्या धर्तीवर MPSCचे कॅलेंडर तयार करण्याचे आश्वासन दिले. २०२५ पासून वर्णनात्मक परीक्षा पद्धत लागू होईल. MPSCच्या परीक्षा खासगी संस्थांकडून न घेता आयोगाकडूनच घेण्यात येतील. आगामी काळात मोठ्या प्रमाणात भरती राबवली जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहिर केले.