पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या; अभिजीत दिपकेंनी व्यक्त केला संताप
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पेपरफुटी आणि गोंधळामुळे परीक्षार्थींमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. पुण्यातील २५ वर्षीय प्रथमेश देशमुखने आत्महत्या केली. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला. त्यांनी परीक्षार्थींना चुकीचे पाऊल न उचलण्याचे आवाहन केले आणि प्रथमेशला न्याय मिळवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.