MPSC विद्यार्थ्यांमध्ये असंतोष का वाढतोय? हजारो तरुणांनी आंदोलनाचा मार्ग का स्वीकारला?
सरकारी नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो स्पर्धा परीक्षार्थींचा संताप सोमवारी पुण्याच्या रस्त्यावर उफाळून आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील पेपरफुटी, गैरप्रकार आणि भरती प्रक्रियेतील विलंबाविरोधात हजारो विद्यार्थ्यांनी 'आक्रोश मोर्चा' काढला. औषध निरीक्षक परीक्षेतील पेपरफुटीनंतर विद्यार्थ्यांमधील असंतोष वाढला असून, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला विविध स्तरातून पाठिंबा दिला जात आहे.