परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा! एसटी महामंडळात १७ हजार ७४२ चालक-वाहकांची कंत्राटी भरती
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) १७,४५० चालक व वाहक कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती होणार आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. ८,३०० नव्या बसेससाठी ही भरती होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना ३०,००० रुपये मासिक वेतन व आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल. या भरतीमुळे राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळेल.