१ कोटी ६४ लाख लाडक्या बहिणींना २,४३७ कोटींची ओवाळणी
मुंबई : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील १ कोटी ६४ लाख ८२ हजार महिलांच्या बँक खात्यांमध्ये २ हजार ४३७ कोटी रुपयांची ओवाळणी जमा केली आहे. महिला व बाल विकास विभागाने ऑगस्ट महिन्याच्या अनुदानाचे वितरण पूर्ण केले असून, थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून ही रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.