इराणच्या ड्रोन हल्ल्यात इराकमध्ये मुंबईमधील इंजिनिअरचा मृत्यू
मुंबईतील मरिन इंजिनिअर देवानंद प्रसाद सिंह यांचा इराकमधील सेफसी विष्णू तेलाच्या जहाजावर इराणच्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला. सिंह हे २०१९ साली मुंबईला स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. हल्ल्यातील इतर १५ भारतीय खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सेफसी विष्णूचे व्यवस्थापन सिंह यांच्या कुटुंबाला आवश्यक ती मदत करणार आहे.