मुंबई पोलिसांत काम न करताच खात्यात जमा होत होते लाखो रुपये; ६.४ कोटींच्या घोटाळ्याने खळबळ!
मुंबई पोलीस दलात २०१९-२०२० दरम्यान १० बनावट कर्मचाऱ्यांच्या वेतनावर ६.४ कोटी रुपये खर्च झाल्याचा घोटाळा उघडकीस आला आहे. या कर्मचाऱ्यांनी कधीही काम केले नसतानाही त्यांच्या खात्यात वेतन जमा होत होते. अंतर्गत लेखापरीक्षणात ही बाब समोर आली. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आला असून, दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.