‘घराबाहेर पडू नका’, मुख्यमंत्री फडणवीस यांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “६ जुलैपर्यंत..”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई, ठाणे, पालघर आणि इतर काही शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने शनिवारी आणि रविवारी 'रेड अलर्ट' जारी केला आहे. फडणवीस यांनी नागरिकांना घराबाहेर पडताना शासनाचे अलर्ट पाहण्याचे आवाहन केले आहे.