बदलापूरनंतर आता नालासोपारा हादरले! तरुणीवर सामूहिक बलात्कार
नालासोपारा येथे ३० वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर नरेंद्र मोर्या, प्रकाश सिंग आणि पंचराज सिंग या तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कोर्टाने तिघांनाही पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर शाळेतील शिपायाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली होती.