नाशिकच्या सातपीर दर्ग्याबाहेर रात्री ११ वाजता काय घडलं? पोलिसांनी दिली ‘ही’ माहिती
नाशिकच्या काठे गल्ली भागात अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी कारवाई केली. जमावाने विरोध केल्याने पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला आणि १५ जणांना अटक केली. दगडफेकीत ३१ पोलिस जखमी झाले. पहाटे साडेपाच वाजता सातपीर दर्ग्याचे ९०% बांधकाम पाडण्यात आले. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून वाहतूक वळवण्यात आली आहे.