महायुतीने नाकारलेल्या नवाब मलिकांना अजित पवारांची साथ? एक्स पोस्टमुळे चर्चेला उधाण!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना महायुतीत घेणे योग्य नसल्याचे पत्र अजित पवार यांना लिहिल्यापासून मलिक राष्ट्रवादीपासून दूर आहेत. अणुशक्तीनगर मतदारसंघात मलिक यांना उमेदवारी मिळणार का, याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. तुरुंगवासानंतर मलिक प्रसिद्धीपासून दूर होते, परंतु स्वातंत्र्यदिनाच्या पोस्टमध्ये राष्ट्रवादीचे चिन्ह वापरल्याने त्यांच्या अजित पवार गटात जाण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.