“स्वाभिमान असता तर…”, सुनेत्रा पवारांच्या ‘त्या’ विधानावरून रोहित पवार यांचे मोठे विधान
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सुप्रिया सुळे यांनी अपघाताच्या तपासावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी त्याला प्रत्युत्तर दिले. रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, अजित पवारांच्या अपघाताचा तपास योग्य पद्धतीने व्हावा अशी मागणी केली. त्यांनी सरकारवर टीका करत, स्वाभिमान टिकवण्यासाठी संघर्ष करण्याची गरज व्यक्त केली.