नीलम गोऱ्हे यांना मिळाला महत्त्वाचा दर्जा, म्हणाल्या, “शिवसेनेच्या पहिल्या महिला…”
ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. त्यांनी स्वतः ही माहिती दिली. गोऱ्हे म्हणाल्या, "मुख्यमंत्री सचिवालयाकडून प्रत आलेली आहे. कॅबिनेट पदाचा दर्जा मला दिलेला आहे. शिवसेनेतील पहिली महिला कॅबिनेट मंत्री म्हणून मला आनंद वाटतोय."