“ना युती, ना आघाडी… स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाणार”, राज ठाकरेंचं विधान चर्चेत
राज ठाकरे यांनी गोरेगाव येथील जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मनसे स्वतंत्रपणे लढणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी कार्यकर्त्यांना आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केले आणि जनतेला फसवणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवण्याचे सांगितले. राज ठाकरे यांनी विश्वास व्यक्त केला की निवडणुकीनंतर मनसे सत्तेत येईल आणि उत्तम महाराष्ट्र घडवेल.