“सणांच्या माध्यमातून लव्ह जिहादच्या घटना”, नितेश राणेंचं VHP च्या भूमिकेला समर्थन
महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि भाजपा नेते नितेश राणे यांनी नवरात्रोत्सवा दरम्यान गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुस्लिमांना प्रवेश नाकारण्याच्या विश्व हिंदू परिषद (VHP) च्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यांनी 'लव्ह जिहाद'च्या घटनांचा उल्लेख करत, ओळखपत्रांची पडताळणी आणि हनुमान चालिसा म्हणण्याची अट घालण्याची मागणी केली. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.