‘दांडियामध्ये मुस्लिमांना प्रवेश नाही आणि हिंदूंना…’, नवरात्रीसाठी VHP ची नियमावली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी न्यूयॉर्कमध्ये विविधतेत एकता असल्याचे म्हटले होते. त्यानंतर विश्व हिंदू परिषदेने महाराष्ट्रात नवरात्रीदरम्यान गरबा आणि दांडिया कार्यक्रमात मुस्लिमांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. व्हिएचपीने आयोजकांसाठी कठोर नियम प्रस्तावित केले आहेत. व्हिएचपीचे प्रवक्ते श्रीराज नायर यांनी मुस्लिमांना प्रवेश न देण्याचे कारण सांगितले आणि कोणत्याही समुदायाच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले.