“अजित पवारांचं पद जावं म्हणून करंगळी-अंगठा कापला”, रोहित पवारांनी घेतली नेत्यांची थेट नावं
रोहित पवार यांनी महाराष्ट्रातील राजकारणात काळी जादू आणि तंत्र-मंत्राच्या वापराचा आरोप केला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाची मागणी करताना, महाराष्ट्रात एफआयआर दाखल न झाल्याने त्यांनी कर्नाटकात झिरो एफआयआर दाखल केला. त्यांनी अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांवर काळी जादू केल्याचा आरोप केला आणि या प्रकरणाचा योग्य तपास व्हावा, अशी मागणी केली.