पंढरपुरात ६८ वर्षीय महिलेकडून ७० वर्षांच्या प्रियकराची हत्या!
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात ६८ वर्षीय मंगल होनमाने यांनी आपल्या ७० वर्षीय प्रियकर अंबादास खांडेकर यांची हत्या केली. दारूच्या व्यसनावरून झालेल्या वादानंतर मंगलने अंबादास यांना धारदार शस्त्राने मारले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून विहिरीत फेकला. डीएनए चाचणी आणि कॉल डिटेल्सच्या आधारे पोलिसांनी तपास करून मंगल होनमाने यांना अटक केली.