पीएच्या पत्नीचा मृत्यू, पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “पोलिसांनी…”
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी गर्जे-पालवे यांनी आत्महत्या केली. मुंबईतील वरळी येथील घरी त्या मृतावस्थेत आढळल्या. पंकजा मुंडे यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत, पोलिसांनी योग्य तपास करावा असे म्हटले. गौरीच्या कुटुंबियांनी अनंत गर्जेवर छळाचे आरोप केले आहेत. फेब्रुवारी २०२५ मध्ये अनंत आणि गौरी यांचे लग्न झाले होते.