पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा २० वर्षांनी निकाल, पद्मसिंह पाटील यांची निर्दोष सुटका
मुंबई : धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर व त्यांच्या चालकाच्या २० वर्षांपूर्वीच्या हत्या प्रकरणाचा बहुप्रतिक्षित निकाल विशेष सीबीआय न्यायालयाने शनिवारी देताना प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह अन्य आरोपींची संशयाचा फायदा देऊन निर्दोष सुटका केली.