विद्यानंद बापट यांना मारहाण करणाऱ्यांमागे मोठी ताकद? सुप्रिया सुळेंचा थेट आरोप
पुण्यात डीजे आणि लाऊडस्पीकरविरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांना अज्ञात तरुणांनी मारहाण केली. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त करत, मारहाण करणाऱ्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली. बापट यांनी माध्यमांशी बोलताना त्यांना सवंग प्रसिद्धी हवी असल्याचे सांगितले. बापट हे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते असून, ध्वनिप्रदूषणाविरोधात सक्रिय आहेत.