“मराठी माणसाच्या अस्तित्त्वावर वरवंटा फिरवून…”, राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका
महाराष्ट्रात मराठी भाषेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत हिंदीची सक्ती केल्याने सर्वपक्षीय नेते आक्रमक झाले आहेत. मनसेने आंदोलनाचा पवित्रा घेतला असून, राज ठाकरे यांनीही यावर रोखठोक भूमिका मांडली आहे. महेश मांजरेकरांच्या पॉडकास्टमध्ये राज ठाकरे म्हणाले की, मराठी माणसाच्या अस्तित्वावर परिणाम होणारा विकास नको आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.