“अजित पवारांनी कधी जातीचं राजकारण केलं नाही”, राज ठाकरेंची स्तुतीसुमने
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणावरून सत्ताधारी व विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण टोकाला पोहोचलं आहे. तसेच, अजित पवारांचं कौतुक करताना राज म्हणाले, ते कधी जातीच्या राजकारणात पडले नाहीत. शरद पवारांबरोबर असतानाही त्यांनी कधी असं वक्तव्य केल्याचं मी ऐकलं नाही.