राजापूरमध्ये एटीएस-आयबीचा छापा; एकाच कुटुंबातील तिघांची चौकशी
राजापूर : राजापूर शहरात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि भारतीय गुप्तचर विभागाच्या (आयबी) पथकाने संयुक्त कारवाई करत एकाच कुटुंबातील पती, पत्नी आणि मुलगी अशा तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. दिवसभर राजापूर पोलीस ठाण्यात चौकशी केल्यानंतर सायंकाळी या तिघांना सोडण्यात आल्याचे समजते. मात्र, या कारवाईबाबत संबंधित यंत्रणांनी अधिकृत माहिती देण्यास नकार दिल्याने प्रकरणाचे गूढ कायम आहे.