धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय राजेंद्र घनवटांच्या पत्नीचा मृत्यू; अंजली दमानियांची पोस्ट काय?
राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय राजेंद्र घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचे पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मृत्यूवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे. राजेंद्र घनवट यांच्यावर शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप आहे. या प्रकरणामुळे धनंजय मुंडे आणखी एका वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.