बकरी ईदच्या वादानंतर मीरा रोडच्या सोसायटीत भीतीचे वातावरण; रहिवासी म्हणाले…
बकरी ईदच्या निमित्ताने मीरा रोडच्या पूनम इस्टेट क्लस्टर १ सोसायटीत बकरे आणल्याने वाद निर्माण झाला. हिंदुत्ववादी संघटनांनी बकरे सोडण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तणाव वाढला. रहिवाशांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला. सोसायटीत जातीय सलोखा असून, पूर्वी कधीही वाद झाला नव्हता. या घटनेमुळे सोसायटीची प्रतिमा डागाळली आहे.