“टाटा समूहाच्या नेतृत्वाबाबत निर्णय होताना ट्रस्टचा आदर होणं आवश्यक”; शरद पवारांची पोस्ट
टाटा सन्सच्या संचालक मंडळातील वाद संपण्याची चिन्हे नाहीत. १७ सप्टेंबरला कार्यकारी अध्यक्षांचा कार्यकाळ वाढवण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने पाठिंबा दिला, परंतु टाटा सन्सच्या सर्वात मोठ्या भागधारकाने हे मतदान अवैध म्हटले आहे. शरद पवार यांनी टाटा समूहाच्या वारशाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. टाटा समूहाच्या नेतृत्वाबाबत निर्णय घेताना संस्थात्मक प्रक्रिया आणि ट्रस्टच्या भूमिकेचा आदर होणे आवश्यक आहे.