“निवडणुकीच्या काळात दंगली घडवण्याचा डाव”, शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा!
राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असून, ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे आमदार संजय शिरसाट यांनी निवडणुकीच्या काळात दंगली घडवण्याचा डाव असल्याचा दावा केला आहे. नाशिक आणि संभाजीनगर येथील दंगली सुनियोजित होत्या आणि विधानसभेच्या निवडणुकीतही असा प्रकार होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.