सोमवती अमावस्या आणि चाकणकरांच्या बोटाला जखम; सुषमा अंधारेंनी समोर आणले ‘ते’ फोटो
आज पुण्यात सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले. चाकणकर यांनी तंत्र मंत्र विद्या वापरून स्वतःचे बोट कापले असल्याचा दावा अंधारे यांनी केला. त्यांनी याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. अंधारे यांनी चाकणकरांना अटक करून नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. तसेच, चाकणकरांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही केला.