“राजीनामा दिला पण माज उतरलेला नाही…”; विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
कॅप्टन अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला आहे. खरातवर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप असून पोलिसांनी ५८ व्हिडिओ जप्त केले आहेत. चाकणकर यांचे काही फोटोही चर्चेत आहेत. विरोधकांनी चाकणकर यांच्यावर टीका केली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. राजकीय वातावरण तापले असून पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष आहे.